सेलू: गोकुळ नगर भागात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी,चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट कैद
Sailu, Parbhani | Oct 27, 2025 सेलू शहरातील गोकुळनगर भागात एकाच रात्रीत तीन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना रविवार दिनांक 25 रोजी पहाटे दिडच्या सुमारास घडली आहे.एका घरातून चोरट्यांनी तब्बल 47.150 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकारया प्रकरणी सेलु पोलीस ठाण्यात दिनांक 26 रोजी दुपारी तीन वाजता गुन्हा दाखल झाला आहे.चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असुन तोंडाला रूमाल बांधलेले चार चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत.