घनसावंगी: गुटखा जप्ती प्रकरणात सदर बाजार पोलिसांवर मेहरबानीचा आरोप; मनसेची सखोल चौकशीची मागणी
जालना शहरातील गुटखा जप्ती प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सखोल चौकशीची मागणी केली आहे. मुख्य आरोपी व गुटखा पुरवठादारांना वाचविण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप मनसेने केला असून, संबंधित तपास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मनसे कामगार जिल्हा सचिव आर. आर. पाटोळे, मनसे सैनिक लखन मदारे, अशोक कांबळे आणि सोमेश मिसाळ यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले. या निवेदनाच