अलिबाग: आरसीएफविरुद्ध शिवसेनेचे तीव्र आंदोलन
सब हेडींग आमदार महेंद्र दळवीं, राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आक्रमक
Alibag, Raigad | Oct 14, 2025 अलिबाग येथील आरसीएफ कंपनी विरोधातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आंदोलन सुरू केले. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्याने या आंदोलनास हिंसक वळण लागले असून कंपनीच्या बाहेरील रस्त्यावर टायर जाळून शिवसेनेने कंपनी आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. दरम्यान आता शिवसैनिक आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करू, 15 आणि 16 तारखेला साखळी उपोषण, तर 17 ऑक्टोबरला संपूर्ण अलिबाग बंद करणार आहेत.