नागपूर शहर: नागपुरात राष्ट्रवादीचे ‘थाळी ठोको’ आंदोलन; महागाई आणि गॅस दरवाढीचा निषेध
वाढती महागाई आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे नागपुरात ‘थाळी ठोको’ आंदोलन करण्यात आले. शहर अध्यक्ष धनेश्वर पेठे आणि महिला शहराध्यक्षा प्रिया फुके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली