Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

घरफोडी टोळी जेरबंद! नरडाणा पोलिसांची धडक कारवाई, २.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात डाबली, मेलाणे आणि नरडाणा परिसरात घरफोडी व मोबाईल चोरी करून दहशत माजवणाऱ्या टोळीचा नरडाणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपी आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून तब्बल २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डाबली येथील घरफोडी प्रकरणाच्या तपासादरम्यान एपीआय निलेश मोरे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी गोरख पवार (१९), गोकुळ भिल (२०) आणि बादल सोनवणे (१८) यांना अटक केली. चौकशीत आरोपींनी अनेक घरफोड्या तसेच सहा मोबाईल चोरीच्या घटना कबूल केल्या. पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, सहा मोबाईल फोन आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. #DhuleNews #NardanaPolice #HouseBreaking #CrimeNews #Shindkheda #MaharashtraNews

Pune City, Pune | Jun 10, 2026
घरफोडी टोळी जेरबंद! नरडाणा पोलिसांची धडक कारवाई, २.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात डाबली, मेलाणे आणि नरडाणा परिसरात घरफोडी व मोबाईल चोरी करून दहशत माजवणाऱ्या टोळीचा नरडाणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपी आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून तब्बल २ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डाबली येथील घरफोडी प्रकरणाच्या तपासादरम्यान एपीआय निलेश मोरे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी गोरख पवार (१९), गोकुळ भिल (२०) आणि बादल सोनवणे (१८) यांना अटक केली. चौकशीत आरोपींनी अनेक घरफोड्या तसेच सहा मोबाईल चोरीच्या घटना कबूल केल्या. पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, सहा मोबाईल फोन आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. #DhuleNews #NardanaPolice #HouseBreaking #CrimeNews #Shindkheda #MaharashtraNews - Pune City News