अहिल्यानगर शहरातील असलेली ऐतिहासिक वेस पाडण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. वाहतुकीस अडथळा येत असल्याचे कारण देत ५०० वर्षांचा इतिहास तसेच अहिल्यानगरची ओळख पुसविण्याचे काम महापालिकेचे आयुक्त करत आहेत. ही ऐतिहासिक वेस आम्ही कदापी पाडू देणारा नाही. त्यांनी जर बुलडोझर चालविला तर आम्ही सर्व नगरकर त्यासमोर झोपू परंतु ऐतेहासिक वेस पाडू देणारा नाही, असा इशारा, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) च्या वतीने अभिषेक कळमकर यांनी दिला आहे