भुसावळ: भुसावळात घरफोडी, ८७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास
भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरात घरफोडी करत चोरी करत चोरट्याने ८७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. २० डिसेंबर रोजी शहर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.