नागपूर शहर: जुन्या वादातून जीवघेणा हल्ला; सदर पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या : अमोल देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक
सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी 8 एप्रिल ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोहन नगर भागात जुन्या वादातून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत एका आरोपीला अटक केली असून, त्याचे इतर साथीदार अद्याप फरार आहेत. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिली आहे.