लातूर: मनपा उपायुक्त डॉ.खानसोळेची सर्वात मोठी कारवाई :क्रॅप मार्केट-60 फुटी रोडवरील गोडाऊनवर छापे, 5 हजार किलो प्लास्टिक जप्त
Latur, Latur | Sep 15, 2025 लातूर :-शहरातील बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर आणि साठा रोखण्यासाठी महापालिकेने सोमवारी लक्षवेधी कारवाई केली. उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा आयुक्त मानसी यांच्या आदेशाने क्रॅप मार्केट परिसर व 60 फुटी रोडवरील काही गोडाऊनवर धाडी टाकल्या. या कारवाईत अंदाजे 5 हजार किलो प्लास्टिक पिशव्या हस्तगत करण्यात आल्या. अशी माहिती मनपाचे उपआयुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान दिली आहे.