लातूर: लातुरात वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी पोलिसांची मोहीमबेशिस्त वाहनचालकांवर ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई; रिक्षा चालकांवर लक्ष
Latur, Latur | Nov 2, 2025 लातूर -लातूर | शहरातील वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी आणि अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी लातूर शहर पोलीस दलाने विशेष मोहिम सुरु केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली व वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविली जात आहे.शहरात वारंवार उभ्या राहणाऱ्या वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई हाती घेण्यात आली आहे.