तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत दि. २२/११/२०२५ रोजी रात्री ९ वाजता दरम्यान मौजा रनेरा टर्निंग, राज्य मार्ग डांबरी रोडवर पेट्रोलिंग करत असताना पो.हवा. गयगये आणि त्यांच्या स्टाफने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला पकडले. मांडवी येथील मालक सहदेव ग्यानीराम ढबाले (४९) आणि चालक महेंद्र माघेराव ढबाले (३५) यांच्या ताब्यातील हिरव्या रंगाचा जॉन डिअर कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि लाल रंगाच्या विना क्रमांकाच्या ट्रॉलीमध्ये १ ब्रास रेती (किंमत रु. ६,०००/-) आढळून आली.