खारघर येथे आज सायंकाळच्या सुमारास लक्ष्मीपूजनाच्या वेळी जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस जोरदार होता त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक गाड्या पाण्यात अडकल्याचे पाहायला मिळाले.