नागपूर शहर: रस्त्यावर मंडप टाकताय सावधान ! धरमपेठ येथे फुटपाथवर टाकलेला मंडप काढण्यासाठी देण्यात आले 48 तासाचे अल्टिमेट
नागपूर महानगरपालिकेच्या धरमपेठ (झोन क्र. २) आरोग्य विभागाने सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना बांधकाम साहित्य आणि कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने नुकतीच एक नोटीस जारी करून संबंधितांना ४८ तासांच्या आज रस्त्यावर टाकलेला मंडप काढण्याचे नोटीस देण्यात आले आहे.महापालिकेच्या 'उपद्रव शोध पथकाने' केलेल्या पाहणीत असे आढळून आले आहे की, शुभम कनोजिया यांच्यातर्फे फुटपाथ रस्त्यावर मंडप टाकण्यात आला आहे.