गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोक्षधाम घाट रोडवर भरधाव बसने दुचाकीला धडक दिल्याने ५० वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. १९ जून २०२६ रोजी मनोज सहारे हे दुचाकीवरून जात असताना बीआर ट्रॅव्हल्सच्या बसने त्यांना धडक दिली.अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाला.