रावेर: भालोद येथील शेतकऱ्याचा विहिरीत तोल जाऊन कोसळल्याने मृत्यू,फैजपूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद
Raver, Jalgaon | Oct 20, 2025 भालोद या गावातील रहिवासी गणेश बाबुराव कोळी वय ४६ शेतकरी शेत शिवारात गेले होते दरम्यान अचानक त्यांचा तोल गेला आणि ते विहिरीत कोसळले. त्यात त्यांच्या डोक्याला जवळ दुखापत झाली. त्यांना उपचाराकरिता तातडीने ग्रामीण रुग्णालय यावल येथे आणले येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी फैजपुर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.