शाहूवाडी: श्री जोतिबा डोंगरावर नवरात्र उत्सवात हजारो भाविकांची गर्दी
शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेनिमित्त श्री जोतिबा डोंगरावर हजारो भाविक जमले. तीन कमळ पुष्पांमध्ये महापूजा आणि पारंपरिक धूपारती सोहळा संपन्न झाला. कोडोली पोलीस व देवस्थान समितीने गर्दीचे नियोजन केले.