*नारायणगाव (खेरवाडी) गायखे मळ्याजवळील खेरवाडी ओणे रस्तालगत तलावशेजारी गणेश लांडगे यांच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत सापडला*. *सदर बिबट्या मृत अवस्थेत आहे हे लक्षात येतात खेरवाडी पोलीस पाटील सौ. तेजल पवार यांना स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून वन विभाग व सायखेडा पोलीस स्टेशन यांना मृत बिबट्या ची माहिती दिली* *वन विभागाने त्वरित घटनास्थळी आपले अधिकारी पाठवून मृत बिबट्यास ताब्यात घेतले. या दरम्यान मृत बिबट्यास बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होती*.