लातूर: लातूरच्या जिल्हा परिषदेच्या समोर दिशाभूल करून उपोषणकर्त्या महिला व पुरुषांना उठवण्याचा पोलिसाचा प्रयत्न
Latur, Latur | Oct 31, 2025 लातूर -बावलगाव (ता. चाकूर) येथील मनरेगा योजनेंतर्गत खोटे व बनावट प्रोसेडिंग तयार करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेसमोर सुरू असलेल्या उपोषण कर्त्यांना आज रात्री सात वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी उपोषणकर्त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र रमाकांत विश्वनाथ कांबळे (उपसरपंच, बावलगाव) व सौ. शितल अमोल कलवले (ग्रा.प. सदस्य, बावलगाव) यांनी पोलिसांचा हा प्रयत्न फेटाळून उपोषण सुरूच ठेवले.शासन व प्रशासनाने अन्याय झाल्याचे कबूल करून दोषींवर कारवाई करेपर्यंत उपोषण सोडणार नाहीत.