नागपूर शहर: 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दिपके यांचा ठाम निर्धार; शांततेच्या मार्गाने आंदोलन पुढे नेण्याची घोषणा
आमच्यावर कितीही हल्ले झाले किंवा धमक्या आल्या, तरी आम्ही आमच्या मुख्य मुद्द्यापासून अजिबात भटकणार नाही, असा ठाम निर्धार 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दिपके यांनी व्यक्त केला आहे. नुकत्याच झालेल्या एका हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली आणि देशातील १ कोटी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हा लढा सुरूच राहील, असे स्पष्ट केले