नागपूर शहर: नागपुरात लाखोचे अनधिकृत 'एचटीबीटी' कापूस बियाणे जप्त
जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकाने 13 मे ला दुपारच्या सुमारास वर्धमान नगर येथील एका गोदामावर धाड टाकून ५१.१९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये विनापरवाना आणि संशयास्पद **'सुकून'** ब्रँडच्या **HTBT** कापूस बियाणांची २,९०७ पाकिटे आणि वाहतूक करणारा ट्रक यांचा समावेश आहे. याप्रकरणी बियाणे कायदा १९६६ आणि पर्यावरण संरक्षण कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.