नागपूर शहर: नागपुरात 'नीट' परीक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था
नागपूरमध्ये आज ३० परीक्षा केंद्रांवर 'नीट' परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.सुमारे १२,५१२ विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होत आहेत. परीक्षा कोणत्याही गैरप्रकाराशिवाय पार पडावी यासाठी प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे. प्रत्येक केंद्रावर सीआरपीएफ (CRPF), सीआयएसएफ (CISF) आणि ८०० शहर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे