नागपूर शहर: सराईत वाहन चोरांना अटक, चोरीच्या गाड्या जप्त!: नितीन चुलपार पोलीस निरीक्षक
पोलीस निरीक्षक नितीन चुलपार यांनी 2 जुलै ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात गुन्हे शाखा वाहन चोरी विरोधी पथकाला मोठे यश आले आहे. पथकाने कारवाई करत दोन सराईत वाहन चोरांना बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे युगांत संजय कापसे आणि अजय संजय सारवन अशी आहेत. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक नितीन चुलपार यांनी दिली आहे.