वर्धा: दारूमफियाना मोठा धक्का!12 लाखहून अधिक किमतीची अवैध देशी-विदेशी दारू व ब्रेझा कार जप्त,2आरोपीना अटक शहर पोलिसाची कारवाई
Wardha, Wardha | Nov 21, 2025 वर्धा शहर पोलिसांनी एका धाडसी कारवाईत अवैध दारू तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईने अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे. या कारवाईत ₹12 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून पोलिसांनी देशी आणि विदेशी दारूचा मोठा साठा, तसेच तस्करीसाठी वापरलेली ब्रेझा (Brezza) कार जप्त केली आहे. असे आज 21 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे