नागपूर शहर: पाचपावली पोलिसांची धडाकेबाज कारवाई: लुटारू टोळीच्या ४ जणांना अटक: रंजीत माजगावकर पोलीस उपनिरीक्षक
पोलीस उपनिरीक्षक रंजीत माजगावकर यांनी 7 जुलै ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार पाचपावली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत लुटारूंच्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. आरोपींनी एका व्यक्तीला मारहाण करून त्याची दुचाकी आणि आयफोन-१३ जबरदस्तीने हिसकावून घेतला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्हीच्या आधारे मुख्य ४ आरोपींना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून ४ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील इतर २ आरोपींचा शोध सुरू आहे. याबद्दलची अधिक माहिती psi रंजीत माजगावकर