नागपूर शहर: हुडकेश्वरमध्ये अनियंत्रित ट्रकचा कहर; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
27 एप्रिल ला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'क्वीन लॉन'जवळ काल रात्री एक भीषण रस्ते अपघात होता-होता टळला. हिंगणा येथील 'सौरभ रोडलाईन्स'चा एक आयसर ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक चारचाकी वाहनांवर आदळला. या भीषण धडकेत अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकची गती अत्यंत जास्त होती. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो समोर उभ्या असलेल्या गाड्यांना धडकला. विशेष