औंढा नागनाथ तालुक्यातील सुरेगाव फाटा येथे दहा डिसेंबर 1986 साली कापूस आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात वीरमरण पत्करलेल्या शेतकऱ्यांना सुरेगाव फाटा येथे दिनांक 10 डिसेंबर बुधवार रोजी सकाळी दहा वाजता शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तात्कालीन शेतकरी नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वात 10 डिसेंबर 1986 साली कापूस दरवाढीसाठी सुरेगाव फाटा येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला हिंसक वळण लागले यादरम्यान तीन शेतकरी शहीद झाले होते