साक्री तालुक्यासह धुळे-नंदुरबार जिल्ह्याच्या पश्चिम पट्टयातील चौपाळे, रोहोड, हनुमंतपाडा, चिंचगावठाण आणि पंचक्रोशीतील आदिवासी गाव-पाड्यांमध्ये मार्गशीर्ष चंद्रदर्शनानंतर सुरू झालेल्या निसर्गदेव डोंगऱ्यादेव पूजन व्रत-उत्सवाची सांगता पार पडली. दीड आठवडा परिसरात पारंपरिक पावरीचा नाद घुमत राहिला, तर डोंगर-दऱ्यांमधून उतरलेल्या माऊलींचे आगमन झाल्यानंतर गावोगावी भक्तिभावाचे वातावरण अधिक दाटले.२६ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या धार्मिक विधींनंतर १५ दिवस उपवास, नित्यनियम पाळणाऱ्या आदिवासी भगिनींनी