नागपूर शहर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती,नराधमाला पोलिसांकडून अटक: कैलास देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 15 मे ला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार नंदनवन पोलीस हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला धमकावणाऱ्या वसीम खान या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे.