लातूर-यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे लातूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून बाभळगाव–धनेगाव–सेलू–बोरी हा मार्ग अक्षरशः चाळण झाला आहे. संबंधित प्रशासनाने दुरुस्तीबाबत दुर्लक्ष केल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज गुरुवारी (दि.१६) सकाळी ११ वाजता खड्यात बेशरमचे झाड लावून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि डबक्यांमुळे वाहनधारकांना मार्गक्रमण करणे धोक्याचे झाले असून दररोज अपघाताची भीती निर्माण झाली आहे.