नागपूर शहर: युवकाचे अपहरण करून त्याला लुटणाऱ्या आरोपींना अटक : अन्नपूर्णा सिंग पोलीस उपायुक्त
पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंग यांनी 25 जूनला रात्री 7 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, कामावरून घरी जात असणाऱ्या युवकाचे अपहरण करून त्याला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मानकापूर पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली असून याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंग यांनी दिली आहे