नागपूर शहर: बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची १ कोटी ४० लाखांची फसवणूक: किरण महामुनी पोलीस उपनिरीक्षक
धंतोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण महामुनी यांनी 8 जून ला सायंकाळी 6:30 वाजता दिलेल्या माहितीनुसारधंतोली परिसरातील सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेची १ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.आरोपींनी संगनमत करून बँकेच्या व्हॅल्युअरला हाताशी धरले आणि कमी मूल्याचा प्लॉट बनावट कागदपत्रे दाखवून बँकेकडे गहाण ठेवला. या आधारे कर्ज उचलून बँकेची फसवणूक केली. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण महामुनी यांनी दिली आहे