नागपूर शहर: बोर्ड ऑफिस चौकात भरधाव कारची बसला धडक; सुदैवाने प्रवासी सुरक्षित
बर्डीवरून बोकाराकडे जाणाऱ्या बसला आज दुपारी १२:०५ च्या सुमारास बोर्ड ऑफिस चौकात भीषण अपघात झाला. बस चौक पूर्ण ओलांडत असतानाच एका भरधाव चारचाकी वाहनाने तिला जोराची धडक दिली.या धडकेमुळे बसचा समोरील बफर आणि दरवाजाची काच फुटली आहे. तसेच कारचे देखील नुकसान झाले आहे सुदैवाने, बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही.बसचे चालक राजकुमार रजक आणि वाहक यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.मिळालेल्या माहितीनुसार, कार चालकाचा वेग अधिक असल्याने हा अपघात घडला. घटनेची नोंद