नागपूर शहर: घूरून का पाहतोस?' म्हणत दोघांवर जीवघेणा हल्ला; किनखेडे लेआउट येथील घटना एका आरोपीला अटक
28 एप्रिल ला दुपारी 4 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीतील प्रवीण राठोड आणि त्यांचे नातेवाईक किशोर सोलंकी हे औषध घेण्यासाठी जात होते. दरम्यान, आरोपींनी त्यांना वाटेत अडवले. त्यांनी दोघांना 'तुम्ही आमच्याकडे घूरून का पाहत आहात?' असे विचारत वाद घातला. वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले. आरोपींनी प्रवीण आणि किशोर यांच्यावर दगड आणि लाठ्यांनी जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्यात प्रवीण राठोड गंभीर जखमी झाले आहेत. तर, किशोर सोलंकी यांनी प्रसंगावधान र