दापोली: दापोलीच्या अभिजीत मयेकर यांची हिमाचल प्रदेशातील ४०० किमी सोलो सायकल मोहीम यशस्वी
दापोलीतील अभिजीत मयेकर यांनी हिमाचल प्रदेशात १६ दिवसांत ४०० किलोमीटरपेक्षा जास्त दुर्गम घाटरस्त्यांवर स्वतःच्या सायकलीवर सेल्फ सपोर्टेड मोहीम यशस्वीपणे पार केली. पठाणकोट, धरमशाला, मंडी आणि मनाली येथे त्यांनी पर्यावरणपूरक संदेश देत विशेष ठिकाणी भेट दिली.