नाशिक: ५६ लाखांचे सोने व चांदी दागिन्यांची चोरी पकडली.
रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांची कारवाईत एक चोरटा अटकेत.
Nashik, Nashik | Oct 11, 2025 ५२ तोळे सोन्याचे व तीन किलो चांदीचे दागिने सोबत घेऊन जात असणाऱ्या व्यापाऱ्याच्या बॅगेवर चोरट्याने डल्ला मारला होता ते मुंबई येथून अमरावतीकडे जात होते. मात्र, वेळ न दवडता रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहिम राबवत मनमाडजवळील परिसरातून चोराला पकडण्यात यश मिळवले.चोरट्यांकडून सुमारे ५६,६८,४५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दादर (मुंबई) येथील सराफ व्यवसायिक प्रदीपकुमार धर्मपाल सिंह हे १० ऑक्टोबर रोजी मुंबई-हावडा मेलने अमरावती येथे व्यवसायिक जाणार होता.