महाराष्ट्रातील वाढत्या अमली पदार्थांच्या घटनांवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. गोरेगाव नेस्को, वरळी आणि पुणे येथील म्युझिक कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटनांचा त्यांनी संदर्भ दिला.