महाड: उरणमध्ये शिक्षकाचा काळा कारनामा! मेहुण्याच्या पत्नीवर विनयभंग आणि अत्याचार; रायगड जिल्हा हादरला
Mahad, Raigad | Nov 9, 2025 समाजात शिक्षक हा आदर्श, मार्गदर्शक आणि सन्माननीय व्यक्तिमत्त्व मानला जातो. मात्र उरण तालुक्यातील एका शिक्षकानेच या पदाचे पावित्र्य काळवंडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या शिक्षकाने स्वतःच्या मेहुण्याच्या पत्नीवर विनयभंग, शिवीगाळ, मारहाण आणि अनोळखी व्यक्तींमार्फत अत्याचार करवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.