नागपूर शहर: कळमना पोलिसांनी कुख्यात वाहन चोरट्यांना केले जेरबंद : प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
29 जुलैला दुपारी 4 वाजता कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कळमना पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान कुख्यात वाहन चोरट्यांना अटक केली आहे. आरोपींकडून वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून वाहन देखील जप्त करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे.