नागपूर शहर: तनिष्क स्टोअर्स मधून सोन्याची बांगडी चोरी, पोलिसांचा तपास सुरू
25 जूनला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार इमामवाडा हद्दीतील 'एआयए बाय तनिष्क स्टोअर्स'मध्ये एका अनोळखी इसमाने दुकानात शिरून सेल्समनला गुंगारा देत १० ग्रॅम १८२ मिलीग्राम वजनाची, ९२,६६४ रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरून नेली. या प्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.