नागपूर शहर: हुडकेश्वर परिसरातून १४ वर्षीय मुलगी बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन
1 जुलैला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतून रोशनी अजय सनोडिया (वय १४, राहणार शिवनी, मध्य प्रदेश; सध्या राहणार कामगार कॉलनी, पिंपळा, नागपूर) ही अल्पवयीन मुलगी २८ जून रोजी मध्यरात्रीपासून बेपत्ता आहे. ती कोणालाही न सांगता घरून निघून गेली आहे.मुलगी सोबत काही कपडे आणि कागदपत्रे घेऊन गेली आहे. या वर्णनाची मुलगी कोणालाही आढळल्यास कृपया पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.