नागपूर शहर: काँग्रेस महिलाविरोधी, नारीशक्ती विधेयकाला विरोध करून पाप केले - चंद्रशेखर बावनकुळे
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत 'नारीशक्ती' विधेयकाला विरोध करून काँग्रेसने महिलांचा अपमान केल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने १९९६ पासून या विधेयकाला विरोध करत देशातील ७० कोटी महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर गदा आणली आहे. काँग्रेसचा हा महिलाविरोधी चेहरा असून, त्यांना या पापाचे फळ निवडणुकीत मिळेल, असे बावनकुळे म्हणाले.