मानगाव: अवैध खैरलाकूड वाहतुकीचा पर्दाफाश
Mangaon, Raigad | Apr 11, 2026 माणगाव तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर अवैधरित्या सोलीव खैर लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर वनविभागाने धाडसी कारवाई करत सुमारे 18 लाख 69 हजार 309 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चालकाविरोधात वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध खैरतोड करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.