नागपूर शहर: नागपूर रेल्वे स्थानकावर VVIP दौऱ्याच्या बंदोबस्तात चंदन तस्कर गजाआड
नागपूर रेल्वे स्थानकावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांच्या नियोजित दौऱ्यानिमित्त कडेकोट बंदोबस्त तैनात होता. दरम्यान, रेल्वे सुरक्षा यंत्रणांकडून राबवण्यात येत असलेल्या ‘घातपात विरोधी तपासणी’ मोहिमेत एका संशयित इसमाला ११ किलो चंदनाच्या लाकडासह ताब्यात घेण्यात आले आहे.