महाड: कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याहस्ते सोमजाई मंदिर जीर्णोद्धार, व्यायामशाळेचे उद्घाटन, बौद्ध विहार भूमिपूजन संपन्न
Mahad, Raigad | Oct 13, 2025 आज सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याहस्ते महाड विधानसभा मतदारसंघातील माणगाव तालुका, कालवण-इंदापूर परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात सोमजाई मंदिराचा जीर्णोद्धार, व्यायामशाळेचे उद्घाटन आणि बौद्ध विहाराचे भूमिपूजन अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश होता. ढोल-ताशांच्या गजरात, भगवे फेटे बांधून, भगव्या मय वातावरणात ग्रामस्थ, महिला भगिनी, शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कालवण गावाने हा सोहळा जिल्हाभरात गाजवला.