कुही: हनुमान मंदिर पचखेडी येथून चांदीचा मुकुट चोरी
Kuhi, Nagpur | Mar 31, 2026 पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या हनुमान मंदिर पचखेडी येथून अंदाजे 35 हजार रुपये किंमतीचा चांदीचा मुकुट चोरुन नेल्याची घटना घडली. तक्रारीवरून वेलतुर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करण्यात येऊन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास वेलतुर पोलीस करीत आहेत.