नागपूर शहर: विदर्भात आता 'सूर्याचा' प्रकोप! अवकाळीनंतर उन्हाच्या झळा वाढणार; पारा ४० अंशांच्या पार जाण्याची शक्यता
विदर्भात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेला ऊन-पावसाचा लपंडाव आता थांबला असून, नागरिकांना आता कडाक्याच्या उन्हाचा सामना करावा लागणार आहे. अवकाळी पावसाचे संकट ओसरताच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून, येत्या काही दिवसांत विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.