नागपूरमधील ताजबाग परिसरात आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई करत बेकायदेशीर बांधकामे बुलडोजरच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. या कारवाईदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.