नागपूर शहर: नागपूर गुन्हे शाखेची धडक कारवाई; विविध गुन्ह्यांत १५ जणांना अटक
नागपूर शहर गुन्हे शाखेने ६ जून रोजी शहरात धडक मोहीम राबवत विविध गुन्ह्यांत १५ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत अवैध दारू, चोरीची वाहने, मोबाईल, घातक शस्त्रे आणि घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.६ ठिकाणी धाडी टाकून ८ आरोपींवर गुन्हे दाखल; ४२ लिटर दारू आणि १२७ बाटल्या जप्त केल्या आहे.