नागपूर शहर: नागपुरात ‘जलक्रांती परिषद-२०२६’ उत्साहात; तामसवाडा पॅटर्नने विदर्भाच्या समृद्धीचा मार्ग मोकळा
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मंत्राला कृतीची जोड देत गेल्या २५ वर्षांपासून जलसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या **पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या** रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त नागपुरात १७ व १८ मे रोजी **‘जलसंवाद’** आणि **‘जलक्रांती परिषद-२०२६’ चे दिमाखदार आयोजन करण्यात आले. या परिषदेत जलसंधारणाच्या यशस्वी **‘तामसवाडा पॅटर्न’** वर विशेष मंथन करण्यात आले.