महागाव: तालुक्यातील कासोळा जवळील ट्रक आणि ट्रॅव्हल्स अपघात प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
महागाव तालुक्यातील कासोळा जवळ शनिवारी दुपारी भरधाव ट्रकने ट्रॅव्हल्स वाहनाला समोरून जबर धडक दिल्याने भिषण अपघात झाला होता. यात प्रवश्या सह ट्रक आणि ट्रॅव्हल्सचालक जखमी झाले होते. या प्रकरणी ट्रॅव्हल्स वाहन क्र. एमएच-२९ बीई-३२३३ चा चालक नामे सेवक एकनाथ पवार वय-२५ वर्ष यांनी दि. ८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रक क्र. टीएस-०१ युसी-१७५३ चा चालका विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.